शहरात स्पा-मसाजच्या नावाखाली
‘सेक्स रॅकेट’चा गोरखधंदा
राजकीय नेते,पोलिस अधिकारीच आंबटशौकीन
स्पामधील तरुणीची आयुक्तांकडे तक्रार
नागालँड,नाशिक,पुण्यातील तरुणींना नोकरीचे आमिष दाखवत शहरात आणून स्पा,मसाज सेंटरच्या नावाखाली स्पा मध्ये देह व्यापार करायला लावल्या जात असल्याची धक्कादायक तक्रार स्वतः स्पा मध्ये काम करणार्या तरुणीने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. विशेष म्हणजे हे सेक्स रॅकेट गेल्या 3 वर्षा पासून सुरू असून ग्राहक म्हणून राजकीय नेते, पोलीस देखील येत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.
या सेक्स रॅकेट बाबत तरुणीने केलेले आरोप असे की, मधूमिता (नाव बदलेले) या 26 वर्षीय तरुणीला सन 2018 मध्ये स्पाचालकांनी नोकरीचे आमिष दाखवत औरंगाबाद येथे आणले होते. व कोकनवाडी चौकातील एका स्पा मध्ये तिला नोकरी दिली. मात्र काही दिवसा नंतर त्या ठिकाणी तिला ग्राहकांसोबत अश्लीलता करण्यास सांगितले सुरुवातीला तिने नकार दिला मात्र तिच्यावर दबाव टाकून शेवटी स्पा मध्येच हे कृत्य करण्यास तिला भाग पाडले.या ठिकाणी येणारे ग्राहक हे उच्चभ्रू ग्राहक असतात हे ग्राहक सुरुवातीला मसाज करण्यासाठी आले असता त्यांना अर्ध नग्नावस्थेतील तरुणीकडून मसाज केले जाते व त्या नंतर शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी 3000 ते5000 रुपयांचा दर सांगितला जातो. ग्राहकाने काऊंटरवर पैसे जमा करताच आतील गुप्त खोल्यामध्ये जागा देण्यात येते. औरंगाबाद नाशिक, पुणे, मुंबईसह नागालँड येथील तरुणी या ठिकाणी कामाला आहेत. या किळसवाण्या कामाला वैतागल्याने तरुणीने देह व्यापार करण्यास नकार दिला असता तिचा नऊ महिन्याचा पगार न देता तिला कामा वरून काढण्यात आले. शिवाय कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी स्पा, मसाज सेंटर चालकाने दिली आहे.नोकरी सुटल्याने पीडित तरुणीला मूळ गावीही जाता येत नाही, आणि पैसे नसल्याने घर भाड्याने घेऊन शहरातही राहणे अवघड झाले आहे.असे पीडित मधूमिता म्हणते. याकडे पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून स्पा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी गुरुवारी पोलीस आयुक्तालयात केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
वेदांतनगर पोलिसांनी तक्रार तर घेतली नाही अर्जही दिला नाही
गुरुवारी पीडित तरुणी स्पा मध्ये घडलेल्या अत्याचारा बाबत वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अर्ज घेऊन गेली होती.मात्र तिथे उपस्थित पोलिसांनी तिचा अर्ज घेतला व तो वाचून ठेवून घेतला. मात्र एवढा गंभीर विषय असताना ती तक्रार दाखल न करता पीडित मधूमिता चा तक्रार अर्ज देखील परत दिला नाही ती स्वतः कडेच घेऊन ठेवला. पोलीस आपली दखल घेत नसल्याने शेवटी तरुणीने पोलीस आयुक्तालय गाठत तक्रार दिली.
पोलिसांना होती गैरप्रकाराची माहिती
मधूमिता म्हणते या स्पा मध्ये अनेकवेळा पोलीस आलेले आहेत.मात्र माझ्या समोर अनेकदा पोलिसांना स्पा चालक जोश आणि हर्षल या दोघांनी मोठी रक्कम दिली.त्या नंतर पोलीस कोणतीही कारवाई न करता माघारी गेले. हे मी डोळ्याने पाहिले आहे ते नित्याचेच आहे.पोलिसांना या सर्व गोष्टींची माहिती आहे.
तीन ते पाच हजारात देहव्यापार
शहरातील सिडको आणि कोकणवाडी या दोन ठिकाणी हा धंदा सुरू आहे. ग्राहक पाहून तरुणीचा रेट फिक्स केला जातो नवीन ग्राहक असल्यास पाच हजार आणि जुना ग्राहक असल्यास तीन ते चार हजार रुपये एका रात्री साठी ग्राहकां कडून घेतले जातात. शहरातील आंबट शौकीन राजकीय नेते अधिकारी देखील या स्पा मध्ये शरीराची भूक भागविण्यासाठी येत असतात असे मधूमिता म्हणते.
नागालँड, नाशिकच्या तरुणीचा समावेश
सुरुवातीला स्पा मध्ये काम करायचे सांगत तरुणींना आणले जाते. या मध्ये नागालँड मधील पाच तरुणी व महाराष्ट्रातील पाच तरुणी आहे. या सर्व तरुणींना उस्मानपुरा भागातील एका हॉस्टेल मध्ये ठेवण्यात आले असून रोज रात्री या तरुणींना देह व्यापारा साठी ग्राहकासोबत बाहेर पाठविले जाते असे पीडितेचे म्हणणे आहे.